AI Job Application : झोपेत एआयच्या मदतीने १००० ठिकाणी नोकरीसाठी केला अर्ज; उठताच जे घडलं ...

मुंबई : हल्ली AI हे आपल्या रोजच्या जीवनातला एक अविभाज्य भाग झाला असून, AI च्या मदतीने अनेक गोष्टी थोड्या सोप्या होत आहेत. याच AI च्या सहाय्याने एका तरुणाने झोपेत नोकरीसाठी अप्लाय केलं. तेही एक दोन ठिकाणी नाही तर चक्क १००० नोकऱ्यांसाठी त्याने एकाच वेळी अर्ज केला आणि सकाळी जे घडले ते अतिशय धक्कादायक होते.



नेमके काय घडले?


काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने AI ची मदत घेऊन रात्रभरात तब्बल १००० नोकऱ्यांवर अर्ज केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार झोपेत घडला आहे. पण याचा परिणाम जो झाला त्याने त्या तरुणाची झोप उडून गेली. सकाळी हा मुलगा उठला तेव्हा तो अक्षरशः चकित झाला. AI ने या तरुणाचं काम तर सोप केलं पण सकाळी उठला तेव्हा याला चक्क ५० हून अधिक कंपन्यांमध्ये मुलाखतीचे फोन आले होते.



मी गाढ झोपेत होतो पण...


रेडिटच्या 'गेट एम्प्लॉयड' फोरमवर आपली व्यथा मांडताना त्या माणसाने सांगितले की, त्याने स्वतः तयार केलेल्या एआय बॉटचा वापर केला. येथे नोकरीच्या उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण करतो. नोकरीचे वर्णन वाचतो, प्रत्येक नोकरीसाठी स्वतंत्र सीव्ही आणि कव्हर लेटर तयार करण्यात आलं आणि कंपनीच्या प्रश्नांची उत्तरे देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. "मी गाढ झोपेत असताना माझा बॉट (सॉफ्टवेअर) रात्रभर काम करत होता आणि या प्रक्रियेमुळे मला एका महिन्यात सुमारे ५० मुलाखतीचे कॉल येण्यास मदत झाली," असे त्या व्यक्तीने लिहिले.



एआयने मला अशी मदत केली


व्यक्तीचा एआय बॉट पूर्णपणे स्वयंचलित आहे आणि तो नोकरीच्या वर्णनावर आधारित कस्टमाइज्ड सीव्ही आणि कव्हर लेटर तयार करतो. यामुळे केवळ स्वयंचलित स्क्रीनिंग सिस्टीम पास करणे सोपे झाले नाही तर मानवी भरती व्यवस्थापकांचे लक्ष देखील वेधून घेतले. "प्रत्येक नोकरीसाठी कस्टमाइज्ड अर्जामुळे माझे प्रोफाइल अधिक आकर्षक बनले आणि माझ्या निवड प्रक्रियेत मला मदत झाली," असे त्यांनी लिहिले.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी