मुंबई : हल्ली AI हे आपल्या रोजच्या जीवनातला एक अविभाज्य भाग झाला असून, AI च्या मदतीने अनेक गोष्टी थोड्या सोप्या होत आहेत. याच AI च्या सहाय्याने एका तरुणाने झोपेत नोकरीसाठी अप्लाय केलं. तेही एक दोन ठिकाणी नाही तर चक्क १००० नोकऱ्यांसाठी त्याने एकाच वेळी अर्ज केला आणि सकाळी जे घडले ते अतिशय धक्कादायक होते.
काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने AI ची मदत घेऊन रात्रभरात तब्बल १००० नोकऱ्यांवर अर्ज केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार झोपेत घडला आहे. पण याचा परिणाम जो झाला त्याने त्या तरुणाची झोप उडून गेली. सकाळी हा मुलगा उठला तेव्हा तो अक्षरशः चकित झाला. AI ने या तरुणाचं काम तर सोप केलं पण सकाळी उठला तेव्हा याला चक्क ५० हून अधिक कंपन्यांमध्ये मुलाखतीचे फोन आले होते.
रेडिटच्या ‘गेट एम्प्लॉयड’ फोरमवर आपली व्यथा मांडताना त्या माणसाने सांगितले की, त्याने स्वतः तयार केलेल्या एआय बॉटचा वापर केला. येथे नोकरीच्या उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण करतो. नोकरीचे वर्णन वाचतो, प्रत्येक नोकरीसाठी स्वतंत्र सीव्ही आणि कव्हर लेटर तयार करण्यात आलं आणि कंपनीच्या प्रश्नांची उत्तरे देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. “मी गाढ झोपेत असताना माझा बॉट (सॉफ्टवेअर) रात्रभर काम करत होता आणि या प्रक्रियेमुळे मला एका महिन्यात सुमारे ५० मुलाखतीचे कॉल येण्यास मदत झाली,” असे त्या व्यक्तीने लिहिले.
व्यक्तीचा एआय बॉट पूर्णपणे स्वयंचलित आहे आणि तो नोकरीच्या वर्णनावर आधारित कस्टमाइज्ड सीव्ही आणि कव्हर लेटर तयार करतो. यामुळे केवळ स्वयंचलित स्क्रीनिंग सिस्टीम पास करणे सोपे झाले नाही तर मानवी भरती व्यवस्थापकांचे लक्ष देखील वेधून घेतले. “प्रत्येक नोकरीसाठी कस्टमाइज्ड अर्जामुळे माझे प्रोफाइल अधिक आकर्षक बनले आणि माझ्या निवड प्रक्रियेत मला मदत झाली,” असे त्यांनी लिहिले.
व्यक्तीच्या सौंदर्याचा आरसा म्हणजे आपला चेहरा. प्रत्येक महिलेची इच्छा असते की, आपली त्वचा चमकदार आणि…
भुवनेश्वर : भारत वि इंग्लंड वनडे मालिका भारतात उद्यापासून (६ फेब्रुवारी) खेळवली जाणार आहे. या…
पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो व महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी महापारेषणच्या…
नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांनी चॅट-जीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय-ऍपचा वापर टाळावा. यामुळे सरकारच्या गोपनीय माहितीला…
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी…
जॉर्जिया : अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात १०० पेक्षा जास्त पिटबुल कुत्र्यांची झुंज लावणाऱ्याला अनेक जन्म घ्यावे…