Gorewada Zoo : नागपूर प्राणीसंग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू!

नागपूर : नागपूरमधील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये (Gorewada Rescue Center) तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान तपासणी अहवालातून या प्राण्यांना बर्ड फल्यूची लागण झाली असून या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र वाघ आणि बिबट्याला नेमका बर्ड फ्लू (Bird Flu) कसा झाला? याबाबत खळबळजनक खुलासा झाला आहे.



राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील वाघ आणि बिबट्याला चिकन खालल्यामुळे बर्ड फ्लूची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर काय निष्पन्न होईल ते पाहावे लागेल. प्रादुर्भाव झालेले प्राणीसंग्रहालय तात्पुरते बंद करण्यात येणार असून  प्राणीसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राण्यांना दिले जाणारे खाद्य तपासून द्यावे, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, चंद्रपूरमध्ये मानव आणि प्राण्यांमधील संघर्षाच्या घटना वाढत असल्याने या प्राण्यांचे स्थानांतरण करण्यात आले होते. मात्र, या रेस्क्यू सेंटरमध्ये आलेल्या प्राण्यांना पक्षी इन्फ्लुएंझाचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना