Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीPune To Solapur : पुणे ते सोलापूर आता फक्त सव्वातीन तासात

Pune To Solapur : पुणे ते सोलापूर आता फक्त सव्वातीन तासात

पुणे : पुणे-सोलापूर दरम्यानचा रेल्वे प्रवास आता अधिक वेगात होणार आहे. या रेल्वे मार्गावरील पटरी आणि इतर कामे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढला आहे. रेल्वेच्या वाढलेल्या वेगाने सोलापूरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता पुण्यात अवघ्या सव्वातीन तासात पोहोचता येणार आहे. यामुळे रेल्वे प्रवास ३५ ते ४० मिनिटांनी कमी होणार आहे. जवळपास ८८ एक्सप्रेस रेल्वेचा वेग आता ११० वरून १३० इतका झाला असल्याची माहिती आहे.

Vande Bharat Sleeper : पुणे आणि मुंबईकरांनो गुडन्यूज! महाराष्ट्रात ‘या’ मार्गावर धावणार पहिली वंदे भारत स्लीपर

पुणे-दौंड-सोलापूर सेक्शनवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेकडून पायाभूत सुविधांच्या सुधारणांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. काही कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये ट्रॅक सुधारणा, ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे दौंड-सोलापूर-वाडी सेक्शनवर (३४१.८० किमी) अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा वेग ११० किमी प्रतितास वरून १३० किमी प्रतितास पर्यंत वाढला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -