Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीVande Bharat Sleeper : पुणे आणि मुंबईकरांनो गुडन्यूज! महाराष्ट्रात 'या' मार्गावर धावणार...

Vande Bharat Sleeper : पुणे आणि मुंबईकरांनो गुडन्यूज! महाराष्ट्रात ‘या’ मार्गावर धावणार पहिली वंदे भारत स्लीपर

नागपूर : वंदे भारत एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेची महत्वाची आणि प्रमुख रेल्वे असून सर्वत्र या गाडीची मागणी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) भरभरून प्रतिसाद मिळत असून आता लांब पल्ल्याच्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये, स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस महाराष्ट्रातसुद्धा धावणार आहे. महाराष्ट्रातील लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस म्हणून नागपूर ते मुंबई आणि नागपूर (Nagpur) ते पुणे या लोहमार्गावर ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याची माहिती नागपूर रेल्वेचे डीआरएम विनायक गर्ग यांनी दिली आहे. त्यामुळे, आता लवकरच प्रवाशांना वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसची सफर करता येणार आहे. त्यामुळे, नागपूर, पुणे आणि मुंबईच्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे.

Los Angeles Palisades : लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग, ५ जणांनी गमावला जीव

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये १६ कोच असणार असून ताशी १४० ते १६० किमी वेगाने ही ट्रेन धावणार आहे. त्यामुळे, प्रवाशांना आरमदायी स्लीपर प्रवासाचा आनंद घेता येईल. देशातील सर्वात हायस्पीड वंदे भारत ट्रेनने नुतकेच शतक पूर्ण केले असून प्रवाशांनाही या ट्रेनची भुरळ पडली आहे. देशातील लांब पल्ल्याच्या विविध मार्गांवर ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद या ट्रेनला मिळत आहे. त्यामुळेच, रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यावर भर दिला आहे. कोलकाता ते दिल्ली, नागपूर ते मुंबई अशा मार्गावर ही स्लीपर वंदे भारत धावणार असून प्रवाशांची उत्तम सोय असणार आहे. त्यात, महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत स्लीपर नागपूर ते मुंबई, पुणे दरम्यान धावणार आहे. दरम्यान, अद्याप या स्लीपर ट्रेनचे भाडे किंवा दरपत्रक जाहीर झालेलं नाही.

स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या अनुषंगाने पुणे, मुंबई व नागपूरकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पुढील काही महिन्यांत नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई दरम्यान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावण्याची शक्यता आहे. स्लीपर वंदे भारतचे उत्पादन सुरू करण्यात आलं असून स्लीपर वंदे भारत कोणकोणत्या मार्गावर सुरू करायची आहे याचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्ड करणार आहे. मात्र, मध्य रेल्वेने एक प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करत नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई दरम्यान स्लीपर वंदे भारतची मागणी केल्याची माहिती नागपूरचे डी.आर.एम विनायक गर्ग यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या नागपूरातून नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-इंदौर आणि नागपूर भोपाळ अशा ३ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -