Wednesday, January 22, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यपैसा, पैसा आणि पैसा...

पैसा, पैसा आणि पैसा…

आपण गुंतवलेला पैसा दुप्पट करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीच्या बाबतीत निर्णय घेतला जातो तेव्हा पैसे दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे समजून घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत हा पैसा आपण कुठे गुंतवतोय याचे भानहीअसणे तितकेच महत्वाचे असते. शक्य तितक्या लवकर त्यांचे पैसे दुप्पट करण्यासाठी नोकरदार लोक विविध प्रकारची गुंतवणूक करतात. काही दिवसात पैसे कसे दुप्पट किंवा तिप्पट होतील हेच अनेकवेळा सामान्यांना समजत नाही.

रचना लचके बागवे

आपल्यातले बहुतांश लोकं पैशांसाठी काम करतात. पैसे मिळवून चांगले आयुष्य जगण्यासाठी काम करतात, तेव्हा त्यांना कळत असतं की, आपण मेहनत केली – काम केलं तरच पैसे कमवू शकतो. पण ह्यांतलेच काही लोकं, जेव्हा तो कमावलेला पैसा कुठे तरी गुंतवायची वेळ येते तेव्हा ते लॉजिक, एथिक्स नियम वगैरे सगळं विसरून जातात आणि आपल्या मेहनतीने कमावलेला पैसा ही निष्काळजीपणामुळे किंवा कमी वेळेत जास्त पैशाच्या हव्यासापोटी गमवून बसतात.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा ‘उभारी’ घेणार…

आपण रोज बातम्या बघतो, जाहिराती पाहतो, त्यात सरकार अनेकदा सांगत असते, कोणत्याही चुकीच्या जाहिरातीच्या आमिषाला फसू नका, कोणालाही आपले अकाउंट डिटेल्स आणि पासवर्ड देऊ नका. पण ह्या सगळ्या गोष्टींना आपल्यातले काही लोकं सहज काणाडोळा करतात आणि पुन्हा पुन्हा अशा आर्थिक घोटाळ्यामध्ये पैसे गुंतवून आपले पैसे कायमचे गमवतात.आम्ही अर्थसंकेतच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेसाठी गेली अनेक वर्षे काम करत आहोत, लोकांना माहिती देत आहोत, कार्यक्रम करीत आहोत, तरी देखील लोक काही सुधारत नाहीत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला हे कळत नाही की, जर सरकार किंवा कोणतीही बँक, म्युच्युअल फंड कंपनी किंवा शेअर मार्केट देखील आपल्याला वर्षाला ५ ते २० टक्के पेक्षा जास्त रिटर्न्स देऊ शकत नाही, तर अशी कोणती माणसं आणि कोणती कंपनी आपल्या आठवड्याला ५ ते १० टक्के परतावा देऊ शकते. ते मुळात शक्य तरी आहे का? आणि आपण काही काळासाठी असे धरून चालू की ते शक्य आहे, तर मग देशातले सर्व श्रीमंत लोकं का मोठंमोठ्या फॅक्टरी उघडून इतकी कामं आणि मेहनत करतील. ते देखील अशा कोणत्या तरी स्कीममध्ये त्यांचे करोडो रुपये गुंतवतील आणि ३ वर्षांत दुप्पट किंवा ५ वर्षांत चौपट कमवतील; परंतु तसं काही होतं नाही. मग सर्वसामान्य नोकरी करून कष्ट करणारे लोकं किंवा साधं जगणारे लोकं का अशा फसव्या स्कीमला उचलून धरतात आणि मग ती लोकं पैसे घेऊन फरार झाले की मग हे इथे रडत बसतात. किती म्हणून आर्थिक साक्षरता करावी. आज या गावात तर उद्या त्या गावात आपल्याला हे असे आर्थिक घोटाळे दिसून येतात. मुळात मुंबईसारख्या शहरामध्ये देखील सुशिक्षित लोकं अशा फसव्या गोष्टींना बळी पडतात याची जास्त खंत आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये देखील हे सगळं आजही चालू आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि इतर सगळीकडेच लोकं आपल्या घरातील दागिने किंवा शेतजमिनी विकून अशा लोकांकडे पैसे देत आहेत आणि स्वतःची फसवणूक करून घेत आहेत. सध्या खेडेगावात देखील ५००-१००० कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे होत आहेत.

कधी शेअर मार्केट तर कधी MLM तर कधी पोंजी स्कीमच्या माध्यमातून लोकांना अधिकतर व्याजाचे, वस्तूंचे आणि इतर गोष्टींचे आमिष दाखवून फसवणूक होत आहे आणि लोकं देखील सारखी-सारखी अशा गोष्टींना बळी पडत आहेत. एकीकडे आपण पाहत आहोत मुलीच्या लग्नासाठी शेतकरी आणि इतर कामगार मंडळी कर्ज काढत आहेत तर दुसरीकडे ह्याच भागातील लोकं अशा पद्धतीने पैसे गमवत आहेत. डोळस गुंतवणूक करणे अतिशय गरजेचे आहे. गुतंवणूक ही आपल्याला आपल्या पैशांचा चांगला परतावा मिळावा आणि ते सुरक्षित देखील राहावेत म्हणून आपण करतो, ते करत असताना आपण दिलेले प्रत्येक पैसे हे आपल्याच नावावर असायला हवेत. कोणाच्या दुसऱ्याच्या हातात पैसे देऊन त्यांच्या नावावर गुंतवणूक करणे अयोग्य. तसेच आपले पैसे आपण गुंतवल्यावर त्याच्या अकाऊंटची माहिती किंवा पासवर्ड इतर कोणालाही देऊ नये. त्याचसोबत अशा ठिकाणी पैसे गुंतवावे जेथे महागाई दरापेक्षा जास्त व्याजदर असेल आणि पैसे सुरक्षित देखील असतील.

खरं गुंतवणूक करणे अगदी सोपं आहे पण आपण उगीचच ते किचकट बनवून ठेवतो. कमी वेळेत जास्त मिळावं म्हणून काही लोकं चुकीच्या माणसांच्या नादी लागतात, जेव्हा महिन्याला ३-४ टक्के देत आहेत असे कळले, तेव्हा समजायचे हे खोटे आहे. जेव्हा मोठमोठ्या बँका मुदत ठेवीवर आपल्याला वर्षाला ७-९ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज नाही देऊ शकत, तेव्हा ह्या छोट्या आणि खोट्या कंपन्या कुठून देतील? एक साधा विचार आपल्याला करायला हवा की नको? शॉर्ट कट इनकम कधीच योग्य पद्धतीने आलेली नसते, त्यापाठी नेहमीच काही तरी झोल असायला हवा हे आपण लक्षात घायला हवं. त्यातले अनेक लोकं आपली जमीन, दागिने विकून अशा स्कीममध्ये पैसे गुंतवतात. मुळात श्रीमंत होण्यासाठी रिस्क घ्यायची ती तरी किती? आपल्या जमिनी विकेपर्यंत? अशा वेळेस नागरिक आपली सदसदविवेकबुद्धी कुठे गहाण ठेवतात? आणि आपल्यासोबत आपल्या मित्र परिवाराला देखील त्यात सामील करतात.

मला ६-८ महिने पैसे मिळाले. माझे पैसे दुप्पट झाले. तुलाही मिळतील करून त्यांच्या हे मेहनतीचे पैसे पूर्ण पाण्यात. आता या सगळ्याला सरकारने देखील काय करावे? आपल्यासारखी लोकं जेव्हा या लोकांवर विश्वास ठेवतात आणि त्यांना प्रोत्साहन देतात, तेव्हाच यांची दुकानं चालतात आणि मग हजारो करोडोंचा चुना लागतो आणि मग हे सगळं करून झालं की जेव्हा एक प्रामाणिक गुंतवणूक सल्लागार त्याला इन्सुरन्स किंवा म्युच्युअल फंडबद्दल प्रामाणिक माहिती देतो, तेव्हा त्यांच्यावर विश्वास बसत नाही आणि मग अशा प्रकारे त्यांचा गुंतवणुकीवरून विश्वास उडालेला असतो. मग गळ्यांनाच ते फसव्या नजरेने पाहू लागतात. या सगळ्या गोष्टींमुळे आज देखील आपल्या देशातील गुंतवणुकीचा आकडा खूप कमी आहे. माणसं सुशिक्षित झाली तरी ते आर्थिकरीत्या सुशिक्षित व्हायला अजून बराच काळ लोटेल. जेव्हा सुजाण व्यक्ती आपल्या फास्ट इनकमसाठी असं करतो तेव्हा आपण अशिक्षित लोकांकडून काय अपेक्षा करणार?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -