बडोदा : टीम इंडियातील कमबॅक करण्यासंदर्भातील सस्पेन्स कायम असताना भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं थेट विजय हजारे ट्रॉफी मैदानातील कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.मोहम्मद शमीने आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवत गुरुवारी विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत हरियाणा विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीनं दमदार कामगिरी केली.
As per multiple reports, Mohammed Shami, the experienced Indian pacer, is anticipated to make a much-awaited comeback to the team after a significant gap.
Virat Kohli is likely to play some County cricket in a bid to prepare well for Test series against England.#MohammedShami pic.twitter.com/WK5NBrBzYZ
— Madhav Yadav (@madhesh4445) January 9, 2025
बंगाल आणि हरयाणा यांच्यातील प्री क्वाटर फायनलची लढत बडोदा येथील मोतीबाग स्टेडिमवर रंगली आहे.या सामन्यात शमीनं बंगाल संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तंदुरुस्त असल्याचे संकेत बीसीसीआय निवडकर्त्यांना दिले आहेत. मोहम्मद शमीनं १० षटकांच्या कोट्यात ६१ धावा खर्च करताना संघाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याचा पहिला बळी हिमांशू राणा हा सहाव्या षटकात यष्टिरक्षक अभिषेक पोरेलने झेलबाद झाला. शमीने त्याच्या पहिल्या स्पेलच्या उरलेल्या षटकांमध्ये ६.६७ च्या इकॉनॉमी रेटने ४० धावा दिल्या. ४२ व्या षटकात त्याने दिनेश बानाला बाद करताना आपली दुसरी विकेट घेतली. शमीने लवकरच अंशुल कंबोजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि सामन्यातील आपली तिसरी विकेट घेतली. या सामन्यात डावाच्या सुरुवातीला सलामीवीर अर्श रंगाने शमीच्या चेंडूंवर दोन षटकार ठोकले होते.
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापतीसह खेळला अन् वर्षभरापेक्षा अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहिला. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत शमी दुखापतीसह खेळला होता. याचा त्याला मोठा फटका बसला. वर्षभरापेक्षा अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहण्याची वेळ त्याच्यावर आली.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी लवकर बीसीसीआय निवडकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीआधी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात १० ओव्हरच्या कोटा पूर्ण करून पुन्हा एकदा टीम इंडियात कमबॅकसाठी तयार असल्याचे संकेत मोहम्मद शमीनं दिले आहेत. अशा परिस्थितीत शमी वर्षभरानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल अशी पूर्ण आशा आहे. बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेच्या मध्यभागी तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती, परंतु त्याला रिकव्हरीदरम्यान समस्या आल्या, त्यामुळे टीम इंडियातील त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले.