Friday, January 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजHMPV संदर्भात WHO ने दिली महत्त्वाची माहिती

HMPV संदर्भात WHO ने दिली महत्त्वाची माहिती

जिनीव्हा : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस अर्थात HMPV संदर्भात जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने महत्त्वाची माहिती दिली आहे. थंडीच्या दिवसात विशिष्ट प्रकारचे आजार हमखास पसरतात. यात प्रामुख्याने श्वसनाशी संबंधित आजार आणि निवडक संसर्गजन्य आजार असतात. चीनमध्ये सध्या थंडीच्या दिवसांतल्या आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. पण परिस्थिती नियंत्रणात आहे. रुग्णांना उपचार मिळत आहेत. घाबरण्याची आवश्यकता नाही.

HMPV Virus : मुंबईतही पोहोचला एचएमपीव्ही; सहा महिन्यांच्या चिमुकलीला लागण

चीनमध्ये इन्फ्लूएन्झा व्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस, ह्युमन मेटान्यूमोव्हायरस आणि कोविड १९ चा निर्माता सार्स कोव्हिड टू यापैकी किमान एखाद्या व्हायरसची बाधा झालेले रुग्ण आढळत आहेत. पण या रुग्णांना उपचार मिळत आहेत, असे WHO ने सांगितले. ही माहिती त्यांनी चीनच्या आरोग्य विभागाच्या अहवालाचा संदर्भ देत दिली. चीनने ह्युमन मेटान्यूमोव्हायरस संदर्भात वैद्यकीय आणीबाणी जाहीर केलेली नाही; असेही WHO ने सांगितले.

HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; लवकरच सरकार जाहीर करणार प्रतिबंधात्मक उपायांसाठी मार्गदर्शक तत्वे

ह्युमन मेटान्यूमोव्हायरस अर्थात HMPV हा एक जुनाच व्हायरस आहे. साधारणपणे थंडीच्या दिवसांत हा विषाणू सक्रीय होतो. या विषाणूची ओळख पहिल्यांदा २००१ मध्ये निश्चित झाली आहे. यामुळे हा अनोळखी व्हायरस नाही.

कोरोनाच्या निमित्ताने जगाला श्वसनाशी संबंधित आजारांचा सामना करण्याचा अनुभव मिळाला आहे. यामुळे ह्युमन मेटान्यूमोव्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी नागरिक सक्षम आहेत. जशी कोरोना काळात काळजी घेतली तशीच म्हणजे हात धुणे, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देणे, आजारी व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे, सर्दी – खोकला येत असल्यास नाक – तोंड झाकण्यासाठी मास्क वा हातरुमाल वापरणे ही खबरदारी घेतल्यास ह्युमन मेटान्यूमोव्हायरसला हाताळणे शक्य असल्याचे WHO ने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -