Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीHMPV Virus : मुंबईतही पोहोचला एचएमपीव्ही; सहा महिन्यांच्या चिमुकलीला लागण

HMPV Virus : मुंबईतही पोहोचला एचएमपीव्ही; सहा महिन्यांच्या चिमुकलीला लागण

मुंबई : कोरोनानंतर आता एचएमपीव्हीचा (HMPV Virus) धोका निर्माण झाल्याने जगभरात एकच खळभळ उडाली आहे. भारतात सुरुवातीला बंगळूरु येथे दोन एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले. त्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथे एक आणि काल नागपूरमध्ये दोन जणांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता या व्हारसने मुंबईतही (Mumbai) एन्ट्री केली आहे.

Alibaug Sea : अलिबागच्या समुद्रात मच्‍छीमार बोट बुडाली; १५ खलाशांना वाचवण्यात यश

मुंबईतील एका सहा महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. तिला हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये (Hiranandani Hospital) आयसीयूत उपचारासाठी दाखल केले आहे. येथील डॉक्टरांनी याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्याचे सांगितले. मात्र आरोग्य विभागाच्या (Health Department) कार्यालयाने मात्र अशी काही माहिती नसल्याचे सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -