Friday, May 9, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी'ती'ची गोष्ट

Hair Care : थंडीत 'या' चुकींमुळे गळतात केस

Hair Care : थंडीत 'या' चुकींमुळे गळतात केस

मुंबई: थंडीच्या दिवसांत केस गळण्याची समस्या सामान्य आहे. थंडीच्या दिवसांत आपल्या केसांना अधिक पोषणाची गरज असते. थंडीत हवा अधिक रुक्ष असते. यामुळे स्काल्प ड्राय होतो. यामुळे केस कमकुवत होऊ तुटू लागतात.


तसेच थंडीत केस धुतल्यानंतर हेअर ड्रायरचा वापर केल्याने केस कमकुवत होतात तसेच पटापट तुटतात. थंडीत केस नियमितपणे धुतले जात नाहीत यामुळे स्काल्पवर घाण जमा होते. यामुळे कोंड्याची समस्या अधिक वाढते. तसेच केस गळण्याचा धोकाही वाढतो.


केस जर व्यवस्थित धुतले नाही अथवा त्यांना व्यवस्थित कंडिशनिंग केले नाही तर केस खराब होऊ शकतात. खूप गरम पाण्याने केस धुतले तर खराब होऊ शकतात. केस धुण्यासाठी पाण्याचे तापमान योग्य राखणे गरजेचे असते.


तसेच ओले केस व्यवस्थित सुकवले पाहिजे. केस ओले राहिल्यानंतर त्यात वास येतो आणि केस गळती रोखली जाते. तसेच अधिक तणाव घेतल्यानेही केस गळू शकतात. यामुळे अधिक तणाव घेऊ नका.


आठवड्यात सतत केस धुतल्यानेही हेअरफॉलची समस्या वाढू शकते.


Comments
Add Comment