Sunday, September 14, 2025

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या मुंबईतील घरात चोरी!

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या मुंबईतील घरात चोरी!

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लो (Poonam Dhillon) यांच्या घरी चोरी झाली आहे. पूनम ढिल्लो यांचा खार येथील उच्चभ्रू परिसरात आलिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये चोरी झाली असून तिच्या अनेक महागड्या वस्तू आणि कॅशही चोरीला गेल्या आहेत. अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चोराला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम यांच्या घरी २८ डिसेंबर ते ५ जानेवारी पर्यंत पेंटिंगचं काम सुरु होतं. याचाच चोराने फायदा उचलला आणि घरातील कपाट खुले पाहून त्याने सामान चोरी केलं. पूनम ढिल्लो यांच्या खार येथील फ्लॅटमधून १ लाख रुपयाचा डायमंड नेकलेस, ३५ हजार रुपयांची रोख आणि काही अमेरिकी डॉलरही चोरीला गेले. चोराने चोरी केलेली काही कॅश खर्चही केली आहे.पूनम जास्त करुन जुहू मध्येच राहतात. काही वेळेस त्या मुलासोबत खार येथे येतात. पूनमचा मुलगा दुबईवरुन घरी आला तेव्हा त्याला बरंच सामान गायब झालेलं दिसलं. अनमोलने पोलिसांना याची माहिती दिली आणि यानंतर पोलिसांनी ६ जानेवारी रोजी अन्सारी नावाच्या आरोपीला अटक केली. अन्सारी हा चित्रकार आहे.आरोपी अन्सारी हा फ्लॅट रंगविण्यासाठी अभिनेत्रीच्या घरी आला होता. यावेळी त्यांनी उघड्या कपाटाचा फायदा घेत सामानाची चोरी केली, अशी महिती पोलिसांनी दिली आहे. पूनम ढिल्लनने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी शेवटचं 'जय मम्मी दी' सिनेमात काम केलं. त्यांनी ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे पूनम यांचे ८०-९० च्या दशकात अनेक चित्रपट गाजले. पत्थर के इंसान, जय शिवशंकर, रमैय्या वस्तावैय्या, बंटवारा या सिनेमांमध्ये काम केलं आहे. पूनम यांना पलोमा ही मुलगीही आहे. तिनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र तिला इंडस्ट्रीत यश मिळवता आलं नाही.

Comments
Add Comment