Tejshree Pradhan : तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट!

मुंबई : मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आणि नावाजलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमीच आपल्या चाहत्यांना नवनवीन रुपात पहायला मिळते.तेजश्रीची प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताची भूमिकाही चाहत्यांना फार भावली होती.चाहत्यांनी तिच्या मुक्ताच्या अभिनयाला भरभरून प्रेम दिले.

तेजश्रीच्या 'हॅशटॅग तदेव लग्नम्' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, अशातच तेजश्रीने प्रेमाची गोष्ट या मालिकेला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे.




माहितीनुसार, तेजश्रीने 'स्टार प्रवाह' वरील प्रेमाची गोष्ट या मलिकेला रामराम करणार आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेतूनही तेजश्रीचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळाला. मालिकेतील मुक्ताला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.परंतु, अचानक तिच्या मालिका सोडण्याच्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. ही मालिका सोडल्यानंतर एक वेगळा चेहरा मुक्ताच्या अभिनयात पहायला मिळणार आहे. मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री मुक्ताची भूमिका साकारणार आहे. हे असलं तरी, तेजश्री प्रधान हिने मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला? हे अद्याप अस्पष्ट आहे.

प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताची जागा आता अभिनेत्री स्वरदा ठिगळे घेणार आहे. माझे मन तुझे झाले, ताराराणी यासारख्या मालिकांमध्ये स्वरदाने आपली छाप पाडली आहे. आता स्वरदा मुक्ताच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लवकरच ती मुक्ताच्या भुमिकेसाठी मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात