नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या ८ कोटींहून अधिक सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. ‘EPFO 3.0’ या नव्या सुधारीत प्रणालींतर्गत, आता
पीएफ (PF) धारकांना त्यांच्या खात्यातील पात्र रक्कम थेट युपीआय (UPI) द्वारे काढता येणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविय यांनी नुकतीच या सुविधेच्या यशस्वी चाचणीची माहिती दिली असून, ही सेवा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुली होणार असल्याचे स्पष्ट केले.
KERALA : मान्सून केरळच्या उंबरठ्यावर
पुढील २४ ते ४८ तासांत धडकणार, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट'
पुणे : कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर दिलासादायक ...
सध्या पीएफचे पैसे काढण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. तसेच १ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास मॅन्युअल पडताळणी करावी लागते. कागदपत्रांमध्ये किरकोळ चूक आढळल्यास क्लेम नाकारला जातो किंवा रखडतो. मात्र, EPFO 3.0 मुळे ही संपूर्ण प्रक्रिया कागदविरहित होणार आहे. यात Employer मंजुरीची गरज नसल्यामुळे आठवड्यांचे काम अवघ्या काही सेकंदांत पूर्ण होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरचे आर्थिक स्थैर्य जपण्यासाठी पीएफ खात्यातील २५ टक्के रक्कम नेहमी लॉक राहील. सदस्यांना त्यांच्या एकूण रकमेच्या ५० ते ७५ टक्क्यांपर्यंतचीच पात्र रक्कम युपीआय द्वारे काढता येईल. उमंग (UMANG) अॅपवर सदस्यांना ‘पात्र शिल्लक’ आणि ‘लॉक केलेली शिल्लक’ स्वतंत्रपणे पाहता येईल. आजारपण, शिक्षण, लग्न किंवा घरासाठी लागणारा निधी या सुविधेमुळे अवघ्या तीन दिवसांच्या आत किंवा अगदी तात्काळ बँक खात्यात जमा करता येईल.
Trade : मे महिन्यात १४.५ कोटी टन मालवाहतुकीचे लक्ष्य साध्य
चेन्नई : विविध जागतिक आव्हानांना तोंड देत भारतीय रेल्वेने मे महिन्यात १४.५ कोटी टन मालवाहतूक करून आपल्या वृद्धीचा वेग कायम राखला आहे. ही कामगिरी मे ...
या डिजिटल सुविधेचा लाभ घेण्यासाठी –
१. सदस्याचे युएएन (UAN – Universal Account Number) सक्रिय असणे गरजेचे आहे.
२. युएएन सोबत पॅन आणि आधार कार्ड लिंक आणि पडताळणी केलेले असावे.
३. पीएफ रेकॉर्ड आणि आधार कार्डवरील नाव तसेच जन्मतारीख यामध्ये कोणताही फरक नसावा, ती तंतोतंत मॅच होणे बंधनकारक आहे.
व्हॉट्सॲप चॅटबॉटचीही सुविधा
पीएफ धारकांसाठी आणखी सोपे करण्यासाठी ही प्रणाली व्हॉट्सॲप चॅटबॉटशी जोडली जात आहे. यामुळे सदस्यांना केवळ एक मेसेज पाठवून आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम आणि पैसे काढण्याची पात्रता सहज तपासता येणार आहे. EPFO च्या या ऐतिहासिक पाऊलामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा आणीबाणीच्या काळात अगदी एटीएम किंवा युपीआय पिन वापरून थेट बँक खात्यात मिळवणे शक्य होणार आहे.