KL Rahul : ऑस्ट्रेलियातून मायेदशी येताच विजय हजारे स्पर्धेतून केएल राहुलची माघार

मुंबई : विजय हजारे स्पर्धेत कर्नाटक संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा यांना उपांत्यपूर्वी फेरीपूर्वी कर्नाटक संघात सहभागी करून घेतलं आहे. त्यामुळे कर्नाटक संघाची ताकद वाढणार आहे. मात्र, कर्नाटकचा स्टार खेळाडू केएल राहुलने विजय हजारे याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.



प्रसिद्ध कृष्णा आणि देवदत्त पडिक्कल देशांतर्गत स्पर्धेत खेळत आहे. हे दोन्ही खेळाडू केएल राहुलसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होते. तरीही देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा उपांत्यपूर्वी फेरीपूर्वी कर्नाटक संघात समावेश करण्यात आला आहे.मात्र, केएल राहुलने विजय हजारे स्पर्धेतून माघार घेतली याचे कारण आता समोर आले आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पाचही सामन्यात केएल राहुल खेळला आहे. त्यामुळे त्याने विश्रांती हवी असल्याचं कारण पुढे केलं आहे.या केएल राहुलच्या निर्णयाला बीसीसीआयकडून मान्यता मिळाली आहे.


केएल राहुलला विश्रांतीची गरज असल्याने आता तो बाद फेरीच्या सामन्यात कर्नाटककडून खेळणार नाही यावर मोहोर लागली आहे. केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत दिसण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही केएल राहुलची निवड होण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केएल राहुलचा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७६ धावांनी विजय

मार्को आणि महाराजच्या फिरकीपुढे भारताची शरणागती अहमदाबाद : दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही

दक्षिण आफ्रिकेने भारताला दिले मोठे आव्हान

अहमदाबाद : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या सुपर एट फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून

इंग्लंडच्या फिरकीपुढे श्रीलंकेची दाणादाण

५१ धावांनी विजय मिळवत इंग्लंडने मारली बाजी कँडी : कँडीच्या मैदानावर पार पडलेल्या अटीतटीच्या टी-२० सामन्यात

BCCI : आता दृष्टिहीन क्रिकेट संघाला मिळणार रॉयल ट्रीटमेंट; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय अंध क्रिकेट असोसिएशन (सीएबीआय) साठी एक योजना जाहीर केली आहे. या

T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या फॉर्मची काळजी करणाऱ्यांची मला काळजी वाटते : सूर्यकुमार यादव

आयसीसी टी२० २०२६ च्या विश्वचषकाचा गट टप्पा संपला असून आता सुपर ८ चा महत्वाचा टप्पा सुरु झाला आहे. या स्पर्धेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर