मुंबई: पपई पोषकतत्वांनी भरपूर असे फळ आहे. पपईचे आरोग्यास अनेक फायदे होतात. तसेच रिकाम्या पोटी पपई खाणेही पाचन, एनर्जी तसेच संपूर्ण आरोग्यासाठी चांगले असते.
पपईमध्ये पपेन नावाचे नॅचरल एन्झाईम असते जे प्रोटीन तोडण्यास आणि त्याचे शोषण करण्यास मदत करते. यात फायबर आणि पाणी बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यास मदत करतात. तसेच पाचनक्रिया सुरळीत राखण्यास मदत करतात.
पपईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते ज्यामुळे इम्युन सिस्टीम मजबूत होते. तसेच दररोज पपई खाल्ल्याने शरीरातील व्हिटामिन सीची कमतरता भरून निघते. तसेच सर्दी-खोकल्याचा त्रासही होत नाही.
वजन कमी करण्यासाठी पपई जेवणाच्या २ तास आधी खाल्ला पाहिजे. यावेळेस पचनक्रिया अॅक्टिव्ह असते. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटामिन ए आणि व्हिटामिन ई असते जे फ्री रॅडिकल्सपासून बचाव करण्यास मदत करतात. तसेच स्किन डॅमेज होण्यापासूनही वाचते. पपई दररोज खाल्ल्याने स्किनला ग्लो येतो तसेच मुरूमांची संख्याही कमी होते. वय वाढण्याची प्रक्रियाही मंदावते.
हृदयाच्या आरोग्यासाठी पपई अतिशय फायदेशीर आहे. यात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यात अँटी इन्फ्लामेंटरी गुणही असतात.
पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असतो त्यामुळे हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. यातील फायबर ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करतात.
पपईमध्ये व्हिटामिन ए आणि बीटा कॅरोटिन असते जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे रात्रीची दृष्टी सुधारण्यातही मदत होते. लिव्हर आणि किडनीसाठीही पपई अतिशय फायदेशीर आहे. यातील फायबर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.