Tuesday, May 6, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

EVM tampering : ईव्हीएमच्या विरोधात मविआ कोर्टात

EVM tampering : ईव्हीएमच्या विरोधात मविआ कोर्टात

मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मतदानाविरोधात तसेच ईव्हीएम मशीन, मतदार यादीतील फेरफार (EVM tampering) केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून हायकोर्टात धाव घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.


यात मविआतील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, रमेश बागवे, मनोहर मढवी, नरेश मनेरा यांच्या कडून निवडणुकी विरोधात याचिका दाखल करणार आहे.






तर दुसरीकडे राज्यात मुंबईमध्ये ३८, औरंगाबादमध्ये १७ तर नागपूरात १२ केसेस दाखल करण्यात आल्या असून आणखी जवळपास शंभर केसेस दाखल होणार असल्याची शक्यता आहे.


विधानसभा निकालावर आणि आयोगाच्या कार्यप्रणाली विरोधात पहिल्यांदाच एवढा मोठ्या संख्येनं कोर्टात याचिका दाखल होणार आहे.

Comments
Add Comment