नवी मुंबई : सिडकोने (CIDCO Lottery) कोकण विभागातील गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २६,००० घरांच्या किंमती जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे तिसऱ्या मुंबईत घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत घरे अल्प उत्पन्न गट (EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी आरक्षित आहेत. घरांच्या किमती ₹२५ लाख रुपयांपासून ₹९७ लाख रुपयांपर्यंत आहेत.
प्रकल्पाचे ठिकाण आणि किंमती
सिडकोच्या या गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत तळोजा, खारघर, पनवेल, कळंबोली, बामणडोंगरी आणि मानसरोवर परिसरात ही घरे उपलब्ध आहेत.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत (EWS) गटासाठी:
तळोजा सेक्टर २८: ₹२५.१ लाख
तळोजा सेक्टर ३९: ₹२६.१ लाख
बामनडोंगरी : ₹३१.९ लाख
खारघर बस डेपो: ₹४८.३ लाख
खारकोपर २A, २B: ₹३८.६ लाख
कळंबोली बस डेपो: ₹४१.९ लाख
कमी उत्पन्न (LIG) गटासाठी:
पनवेल बस टर्मिनस: ₹४५.१ लाख
खारघर बस टर्मिनस: 48.3 लाख
खारघर स्टेशन, सेक्टर १A: ₹९७.२ लाख
तळोजा सेक्टर ३७: ₹३४.२ ते ₹४६.४ लाख
वाशी ट्रक टर्मिनल: ₹७४.१ लाख
मानसरोवर रेल्वे स्टेशन: ₹४१.९ लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन: ₹४६.७ लाख
खारकोपर पूर्व: ₹४०.३ लाख
मुदतवाढ आणि अर्ज प्रक्रिया:
सिडकोने ऑनलाइन अर्ज (CIDCO Lottery) सादर करण्याची अंतिम तारीख १० जानेवारी २०२५ पर्यंत वाढवली आहे. ही घरे प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत बांधण्यात आली असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही अर्ज करता येईल.
अर्जासाठी कागदपत्रे आणि अटी:
घरे खरेदीसाठी अर्ज करताना उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, आणि इतर वैध ओळखपत्रे आवश्यक असतील.
घर खरेदीसाठी सुवर्णसंधी:
सिडकोने जाहीर केलेल्या या योजना नवी मुंबई आणि परिसरातील घर खरेदीसाठी मोठा दिलासा देणाऱ्या आहेत. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि कमी उत्पन्न गटांसाठी घरांचे आरक्षण केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे.
घरांच्या विक्रीला कसा प्रतिसाद मिळतो हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. ही योजना नवी मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे.
सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबई आणि परिसरात घर खरेदीची ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील, कोकणातील ग्रामीण भागातील व्यक्तीलाही या योजनेअंतर्गत अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे सिडकोच्या या गृहनिर्माण प्रकल्पांना आता कसा प्रतिसाद मिळतो हे येत्या काही दिवसात कळणार आहे.