Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीTransformer stolen : ट्रान्सफॉर्मर चोरट्यांमुळे महावितरणला झटका तर ग्राहकांना मनस्ताप; तीन ट्रान्सफॉर्मर...

Transformer stolen : ट्रान्सफॉर्मर चोरट्यांमुळे महावितरणला झटका तर ग्राहकांना मनस्ताप; तीन ट्रान्सफॉर्मर चोरीला

श्रीकांत नांदगावकर

तळा : तळा तालुक्यात खांबवली, कासेखोल वाशी या गावामध्ये १५ दिवसांच्या अंतरात महावितरणचे तीन ट्रान्सफॉर्मर (Transformer) चोरीला गेल्याची घटना घडली आहे. डीपी चालू स्थितीत असताना मुख्य प्रवाह बंद करून त्याच्या आतील धातुच्या तारा चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. यामुळे महावितरणला नुकसान होत असून वीज खंडीत होत असल्याने ग्राहकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता केली जात आहे.

यावेळी चोरांनी फॉर्म हाऊसला टार्गेट केले असून येथे असलेल्या ट्रान्सफॉर्मरची चोरी केली. निर्जन ठिकाणी लावलेली इलेक्ट्रॉनिक डीपी चोरट्यांसाठी सॉफ्ट कॉर्नर ठरतात. डिपीमध्ये शेकडो लिटर ऑईल असते रात्रीच्यावेळी डीपी मधील ऑईल आणि धातूच्या कॉईल काढून नेल्या जातात. डिपी मधील धातूच्या कॉईलची भंगारात विक्री केली जाते. या कॉईल महागात विकल्या जातात. ऑईल आणि कॉईल विक्रीतून सोप्या पद्धतीने पैसे मिळवण्यासाठी काही चोरटे अशा प्रकारच्या चोऱ्या करतात.

Nashamukt Navi Mumbai : भाज्यांच्या ट्रकमधून येतात नवी मुंबईत नशेचे पदार्थ! कॉलेज परिसरात सर्व काही मिळतं!

ऑईल, कॉईल आणि विजेची साधने चोरीला गेल्यानंतर विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५, कलम १३६ अन्वये गुन्हे दाखल केले जातात. यामध्ये सहा महिने ते पाच वर्ष कारावास, १० हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. महावितरण कडून इलेक्ट्रॉनिक डीपी संदर्भात तळा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल झाली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी (दि.१९.११.२३) रोजी अशाच प्रकारे तळा रोहा रस्त्यालगत राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची चोरी करण्यात आली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवसात पोलिसांनी डीपीची चोरी करणाऱ्या देवकांन्हे आदिवासी वाडी तालुका रोहा येथील दोघांना अटक केली होती.

आता पुन्हा ट्रान्सफॉर्मरच्या चोरीच्या घटनेत वाढ होत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्याकडून देखील हीच अपेक्षा तळेवासी बाळगून आहेत.

ट्रान्सफॉर्मरच्या चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होत आहे. नागरिकांनी ट्रान्सफॉर्मरची निगराणी करावी त्याच्याकडे लक्ष ठेवून राहावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता घेवारे यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -