आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला; युतीच्या चर्चेला पुन्हा सुरूवात

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असून, सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करेल, अशा चर्चा रंगल्या आहेत.


यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील १६ महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याबाबत समन्वय समिती स्थापन करून नियोजन करण्याबाबत चर्चा आहे. अशातच भाजपाचे मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे (Ashish Shelar meets Raj Thackeray) भाजपा आणि मनसे युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.



'आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट ही महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने सदिच्छा भेट होती. आशिष शेलार आता मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागांतर्गत काही चर्चा झालेली असू शकते. आताच विधानसभा निवडणुका झाल्यात. आपलं नवीन सरकार बसलेले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची केवळ सदिच्छा भेट होती, इतकाच अर्थ आहे. यात दुसरा कोणताही अर्थ नाही,' असे भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.

Comments
Add Comment

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा

मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारीपासून बदलणार

मुंबई : नव्या वर्षात रेल्वेने एक - दोन दिवसांसाठी फिरायला जाण्याची योजना असेल तर आधी हे वाचा. कारण मुंबई-पुणे

'जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा'

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण

शिवडीत सिलेंडर स्फोट, गुरुकृपा चाळीत अग्नितांडव; ५ ते ६ घरे जळून खाक

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असताना शिवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर