नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरूपती मंदिरात बुधवारी वैकुंठ द्वार दर्शन तिकीच केंद्राजवळ झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान ६ भक्तांचा मृत्यू झाला आहे. खरंतर, सकाळपासून हजारोच्या संख्येने भक्तगण वैकुंठ द्वार दर्शन टोकनसाठी तिरूपतीच्या विविध तिकीट केंद्रांवर रांगेमध्ये उभे होते. वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खोलण्यात आले आहेत. यामुळे टोकनसाठी हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते.
यावेळी चेंगराचेंगरी झाल्याने एकच गोंधळ झाला. या चेंगराचेंगरीदरम्यान चार जणांचा मृत्यू झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे. परिस्थिती बिघडत असलताना तिरूपती पोलिसांनी मोर्चा सांभाळला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दर्शनासाठी टोकनच्या रांगेत ४ हजार लोक होते. स्थितीबाबत मंदिर समितीचे चेअरमन बीआर नायडू आपात्कालीन बैठक करत आहेत.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरूपतीमध्ये विष्णू निवासमजवळ तिरूमाला श्रीवारी वैकुंठ द्वारामध्ये दर्शनासाठी टोकन घेताना झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान चार भक्तांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी यात जखमी झालेल्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांबद्दल माहितीही घेतली.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…