लांजा नगरपंचायतीच्या तीन प्रभागात पाण्याची बोंबाबोंब; नागरिकांचे पाण्यापासून हाल
लांजा : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात पाईपलाईन फुटल्याने लांजा नगरपंचायतीच्या तीन प्रभागात पाण्याची बोंबाबोंब झाली आहे.
Crime News : नियतीचा खेळ! तरुणाने मित्रांसह वाढदिवसाचा केक कापला अन् अवघ्या तासात…
गेल्या चार दिवसांपासून या तीनही प्रभागांमध्ये पाण्याचा थेंब न आल्याने प्रभाग क्रमांक ४, ८ आणि ९ मधील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
लांजा शहरातून जाणार्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवले
दरम्यान, लांजा शहरातून जाणार्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणार्या संपादित जागेतील इमारती, दुकाने, टपर्या गुरूवारी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आल्या. गुरूवारी सकाळपासून ही कारवाई करण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तसेच राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती.चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेवर टपरीधारक, दुकानदार यांनी बस्तान बसवले होते.
तर अनेक वर्षापासून रखडलेल्या उड्डाणपुलाच्या खांबाच्या कामाने वेग घेतल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने मागील काही दिवसांपासून वेग घेतला आहे. मात्र शहरात संपादित जागेतच अनेक ठिकाणी टपर्या, दुकाने उभारण्यात आलेली होती. तर काही ठिकाणी चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जागेतील अनेक इमारती मालकांना आणि दुकानदारांना त्यांच्या जागेचा मोबदला दिला गेलेला नसल्याने इमारती, दुकाने हलवण्याबाबत अडथळा केला जात होता. लांजा शहरातील ४७ प्रकरणात अशा प्रकारे इमारत मालकांनी आपल्या बांधकामांवर हातोडा फिरविण्यास नकार दिला होता. त्यामुळे शहरात चौपदरीकरणाचे काम रखडले होते.