बंगळुरु : नियती तिचा खेळ कधी आणि कसा दाखवेल याचा कोणालाच पत्ता नसतो. अशीच एक घटना बंगळुरुमध्ये घडल्याचे समोर आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा त्याच्या वाढदिवशीच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर अवघ्या काही तासांत ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जाते आहे. (Crime News)
HMPV व्हायरसची महाराष्ट्राला धडक! ‘या’ जिल्ह्यात सापडले २ पॉझिटिव्ह रुग्ण
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वसतीगृहात ही घटना घडली. निलय कैलाशभाई पटेल असे मृत तरुणाचे नाव असून ५ जानेवारी रोजी या तरुणाचा २९वा वाढदिवस होता. वसतीगृहात रात्री १२ वाजेच्या सुमारास मित्राच्या खोलीत केक कापून निलयचा वाढदिवस साजरा केला. मात्र त्यानंतर मध्यरात्री तो त्याच्या खोलीत जात असताना दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून तो खाली कोसळला.
दरम्यान, सकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास सुरक्षा रक्षकांना वसतिगृहाच्या इमारतीसमोर त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Crime News)
HMPV व्हायरसची महाराष्ट्राला धडक! ‘या’ जिल्ह्यात सापडले २ पॉझिटिव्ह रुग्ण
It is with profound sadness that IIM Bangalore shares the news of the untimely passing of our PGP 2023-25 student, Nilay Kailashbhai Patel.
A bright student, and a much loved friend to many, Nilay will be sorely missed by the entire IIMB family. pic.twitter.com/aSVp6y7Pcr
— IIM Bangalore (@iimb_official) January 5, 2025