भारतीय नौदलाचे बळ वाढवणार निलगिरी, सुरत आणि वाघशीर

  133

मुंबई : शिवालिक श्रेणीची निलगिरी फ्रिगेट, कोलकाता श्रेणीची सुरत विनाशिका आणि स्कॉर्पिअन गटातील कलवरी श्रेणीची वाघशीर ही पाणबुडी या स्टेल्थ तंत्रज्ञानाने तयार केलेल्या तीन नौका भारतीय नौदलात दाखल होत आहेत. या तीन नौकांमुळे नौदलाचे बळ वाढणार आहे. माझगाव गोदीत तयार झालेल्या निलगिरी, सुरत आणि वाघशीर या तीन नौका मुंबईच्या गोदीत बुधवार १५ जानेवारी रोजी भारतीय नौदलात दाखल होणार आहेत. या निमित्ताने मुंबईच्या गोदीत विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.



निलगिरी फ्रिगेट आणि सुरत विनाशिका यांच्यावरुन चेतक, ध्रुव (आधुनिक हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर), सी किंग, एमएच - ६० आर - सी हॉक ही हेलिकॉप्टर दिवस - रात्र कोणत्याही वेळी उतरू शकतील अथवा उड्डाण करू शकतील. यामुळे या दोन्ही नौकांच्या मदतीने रात्रंदिवस काम करणे शक्य आहे. दोन्ही नौकांवर नौसैनिकांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची आधुनिक आणि आरामदायी अशी व्यवस्था आहे. महिला नौसैनिकांसाठी या नौकांवर विशेष व्यवस्था आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेल्या शिवालिक श्रेणीच्या निलगिरी फ्रिगेट आणि कोलकाता श्रेणीच्या सुरत विनाशिका या रडारपासून स्वतःचे नेमके अस्तित्व दीर्घकाळ लपवण्यास सक्षम आहेत. अतिशय कमी आवाज करत वावरणाऱ्या या नौकांची रचना खोल समुद्रातही वेगाने हालचाल करण्यासाठीच केली आहे.



कलवरी श्रेणीची वाघशीर ही पाणबुडीही स्टेल्थ तंत्रज्ञानाने तयार केली आहे. यामुळे ही पाणबुडी रडारपासून स्वतःचे नेमके अस्तित्व दीर्घकाळ लपवण्यास सक्षम आहेत. अतिशय कमी आवाज करत वावरणाऱ्या या पाणबुडीची संहारक क्षमता मोठी आहे. टॉर्पेडो (पाणतीर), क्षेपणास्त्र, प्रगत सोनार प्रणाली यांच्या मदतीने समुद्रातून समुद्रावर, समुद्रातून जमिनीवर किंवा आकाशात, पाणबुडी विरोधी युद्धात प्रभावी कामगिरी करण्यासाठी ही पाणबुडी सक्षम आहे.



नौदलात दाखल होत असलेली सुरत विनाशिका ही कोलकाता श्रेणीची चौथी आणि शेवटची विनाशिका आहे. तसेच वाघशीर पाणबुडी ही कलवरी श्रेणीची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. माझगाव गोदीने निलगिरी फ्रिगेट, सुरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडी यांची निर्मिती करून आत्मनिर्भर भारत या भारत सरकारच्या स्वप्नाची पूर्तता करण्याच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे.
Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई