तिबेटमध्ये भूकंप, ५३ जणांचा मृत्यू

तिबेट: तिबेटमध्ये झिजांग प्रांतातील शिगाजे शहरातील डिंगरी काउंटीत स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी तर भारतीय वेळेनुसार सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी ७.१ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे हादरे नेपाळ आणि भारतातही जाणवले. भूकंपामुळे तिबेटमध्ये आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असून ६२ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली दहा किमी. आतमध्ये होता.



अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने आणि भारताच्या राष्ट्रीय भूकंप केंद्राने ७.१ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद केली आहे तर चीनच्या शिन्हुआ या वृत्तसंस्थेने ६.८ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाल्याचे वृत्त दिले आहे.

भूकंपामुळे जमीन हादरली. नेपाळमध्ये नागरिक घाबरून घरांबाहेर आले आणि बराच वेळ रस्त्यांवरच उभे होते. भारतात बिहार आणि उत्तर प्रदेशसह दिल्ली एनसीआरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी डिसेंबर २०२३ मध्ये चीनच्या गांसु आणि किंघई प्रांतात ६.२ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे १२६ जणांचा मृत्यू झाला होता.
Comments
Add Comment

थायलंडमधील रेल्वेवर क्रेन कोसळल्याने २२ जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवजड क्रेन रेल्वेवर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प