मुंबई : मराठी आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या श्रेयस तळपदेची नेहमीच चर्चा असते. हल्लीच आलेल्या पुष्पा चित्रपटाला श्रेयसने व्हॉईस ओवर दिला आहे. त्याचप्रमाणे कंगना राणौत दिग्दर्शित इमरजन्सी या चित्रपटात देखील श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता श्रेयसने चित्रपटासोबत मालिका विश्वातही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
Emergency Trailer Launch : ‘इमरजन्सी’चा नवा ट्रेलर रिलीज ! हा मराठी अभिनेता करतोय काम
काही तासांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्रेयस तळपदेने इमरजन्सी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे मेकअप रूम मधील काही क्षण शेअर केले आहे. ज्यामध्ये श्रेयसच्या डोक्यावरचा हेअर स्टायलिस्टने चिटकवलेला विग काढताना तेलाचा वापर केला आहे. ते तेल लावताना अभिनेता म्हणतोय ना आदीवासी ना ब्रिजवासी ये है स्वर्गवासी तेल हे तेल डोक्याच्या मागच्या बाजूने लावल्यास केस नव्याने येतील. असा हशा पिकवणारा श्रेयसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
येत्या १७ जानेवारीला श्रेयसचा इमरजन्सी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी २५ जून १९७५ मध्ये देशावर लादलेल्या आणिबाणीवर आधारित आहे. आता या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहे.