मुंबई : सध्या एकामागोमाग एक जबरदस्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. पुष्पा २ चित्रपट कोट्यवधींची कामाई केली. पुष्पा २ नंतर आलेल्या चित्रपटांनंतरही पुष्पाची क्रेझ कायम आहे. अशातच आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी २५ जून १९७५ मध्ये देशावर लादलेल्या आणिबाणीवर आधारित असलेल्या ‘इमरजन्सी’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे.
अनेक अडथळ्यांनंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर २०२४ मध्ये स्वातंत्र्य दिनी रिलीज केला होता. यानंतर अनेकांनी या चित्रपटावर टीका केली. तसेच या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले होते.
चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री कंगना राणौतने केले असून या चित्रपटातील इंदिरा गांधींची भूमिका सुद्धा कंगनाने केली आहे. तर अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. रिलीज केलेल्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये अनुपम खेर तुरुंगातून तत्कालीन पंतप्रधानांना पत्र लिहिताना यात दिसतात. या चित्रपटात मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने सुद्धा काम केले आहे.
1975, Emergency — A Defining chapter in Indian History.
Indira: India’s most powerful woman. Her ambition transformed the nation, but her #EMERGENCY changed its history forever.🎥 #EmergencyTrailer Out Now! https://t.co/WGDYPawHN0
Witness #KanganaRanaut’s portrayal of… pic.twitter.com/mb0OCM4tvd— Anupam Kher (@AnupamPKher) January 6, 2025
हा चित्रपट येत्या १७ तारखेला रिलीज होणार असून कंगनाचे इतर चित्रपट ९ वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहे. आता कंगना सोबतच तिच्या चाहत्यांचे सुद्धा १७ तारखेकडे डोळे लागले आहे.