Saturday, March 22, 2025
Homeदेशछत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला, ९ हुतात्मा

छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला, ९ हुतात्मा

रायपूर : छत्तीसगडमधील बीजापूरमधल्या कुटरू भागात अंबेली गावाजवळ नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात जिल्हा राखीव रक्षकांपैकी (District Reserve Guard – DRG) आठ जवान आणि जवानांच्या वाहनाचा चालक असे नऊ जण हुतात्मा झाले. अनेकजण जखमी झाले. हा हल्ला सोमवारी दुपारी सव्वादोन वाजता झाला. नक्षलवाद्यांनी आयईडीचा (Improvised Explosive Device – IED) वापर करून सुरक्षा पथकाच्या वाहनाला लक्ष्य केले. हल्ल्याच्या वृत्ताला बस्तर रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांनी दुजोरा दिला आहे.

धाराशिवमध्ये पारधी समाजाच्या दोन गटात हाणामारी, चौघांचा मृत्यू

याआधी शनिवारी अबुझमाड येथील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा पथक यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत एक जिल्हा राखीव रक्षक आणि प्रधान आरक्षक सन्नू कारम हे हुतात्मा झाले. सुरक्षा पथकाने या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार केले. ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक महिला नक्षलवादी होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -