Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीबीड जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; एसआयटीमधून दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

बीड जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; एसआयटीमधून दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

बीड : कर्तव्यावर असलेल्या राजेश पाटील आणि प्रशांत महाजन यांनी योग्यवेळी जर तक्रार नोंदवून घेतली असती तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता, असं मत धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केलं. त्यानंतर आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. घटना घडली तेव्हा या ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्षपणे काम केले नाही. त्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता. केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची विनंतीवरुन नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तर पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची केज पोलीस स्टेशन प्रभारी, पोलीस निरीक्षक सय्यद मजहरअली अबुतालीब यांची नियंत्रण कक्षातून परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रभारी, पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची नियंत्रण कक्षातून केज पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे. एपीआय गणेश मुंडे यांची महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरुन पुणे येथे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

Manmad Accident : मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यु…!

संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली असून यामध्ये बीडमधील काही कर्मचारी कार्यरत आहेत. मनोज वाघ आणि महेश विघ्ने या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना एसआयडीमधून वगळण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -