Friday, January 17, 2025
Homeताज्या घडामोडीManmad Accident : मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यु...!

Manmad Accident : मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यु…!

मनमाड : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनमाड येथील चांदवड रोडवर धावत्या ट्रकखाली सापडून दहावीत शिकणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मनमाड येथील चांदवड रोडवर पाटील गॅरेज समोर चांदवड कडुन मनमाड कडे येत असताना रस्त्यात गायी अंगावर आल्याने त्यांना वाचवताना बॅलन्स जाऊन मोटारसायकल पडली व यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने या दोघांनाही चिरडले यात मोटारसायकल वरील आदित्य मुकेश सोळसे व वैष्णवी प्रवीण केकान राहणार हनुमान नगर या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की या दोन्ही मुलांचा अक्षरशः चुरा झाला यामुळे यांची ओळख पटने देखील शक्य नाही त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या हस्ते विविध रेल्वे प्रकल्पांचा शुभारंभ!

मोकाट जनावरे आणि रोजची वाहतुक कोंडी मुळे अपघात..!

मनमाड शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे फिरत आहेत याबाबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या मात्र कोणीही याबाबत दखल घेत नाही याशिवाय चांदवड रोड मालेगाव रोड व येवला रोड या महामार्गावर मोठया प्रमाणावर वाहतुक कोंडी होत असते यामुळे देखील रोज अपघात होत असतात आजही मोकाट जनावरामुळे दोन शाळकरी मुलाचा जीव गेला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -