Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Monkey : माकडाला पकडण्यासाठी वन विभाग पिंजरे लावणार

Monkey : माकडाला पकडण्यासाठी वन विभाग पिंजरे लावणार

सोलापूर : बार्शी तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यात वाघ, बिबट्याची दहशत सुरू असतानाच उक्कडगाव येथे गत काही महिन्यापासून माकडाच्या सुरू असलेल्या उच्छादाबाबत वन विभागाला जाग आली. या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने उक्कडगाव येथे ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात येणार असून, माकडाला पकडून वन अधिवासात सोडले जाणार आहे. माकडाच्या बंदोबस्ताबाबत वन विभागाला निवेदन देऊनही वन विभागाकडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप होत होता. माकडाच्या वर्तवणुकीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.



सदर उपद्रवी माकड दिवसा थेट घरांत घुसून अन्नधान्याची, दूध, दुधाचे कँड, गहू, ज्वारी आदीचे नुकसान करत आहे. या माकडाने गावातील महादेव मंदिरात व मंदिरावर धुमाकूळ घालत चक्क मंदिराचा कळस हलवून नुकसान केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वीच या मोकाट माकडाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला निवेदन दिले होते. मात्र, तरीही या पत्रावर कोणतीच कारवाई न झााल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात होता. माकडाने पाच ते सहा कुत्र्यांना पकडून फिरवत आपटून ठार मारल्यामुळे गावकरीही भयभीत झाले आहेत.


Comments
Add Comment