ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Canada Prime Minister Justin Trudeau) लवकरच राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. सत्ताधारी पक्षात ट्रुडो यांच्याविषयीची नाराजी वाढली आहे. यामुळे ट्रुडोंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. बुधवारी पक्षाची महत्त्वाची बैठक आहे. ही बैठक होण्याआधीच ट्रुडो पंतप्रधान पदाचा आणि पक्षातील नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नव्या पंतप्रधानांची निवड होऊन त्यांनी पदभार स्वीकारेपर्यंत ट्रुडो हेच काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करणार की ही जबाबदारी इतर एखाद्या नेत्याकडे सोपवली जाणार हे अद्याप समजलेले नाही.
Burkha : 'या' युरोपीयन देशात हिजाब, बुरखा घालण्यावर बंदी
बर्न : युरोपमधील बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि बल्गेरियामध्ये बुरखा बंदी बाबत कायदे करण्यात आले आहेत. आता स्वित्झर्लंडमध्ये ...
ट्रुडो सरकारमध्ये कार्यरत असलेले अर्थमंत्री डॉमिनिक लेब्लँक यांच्या नावाची संभाव्य पंतप्रधान म्हणून चर्चा होत आहे. या विषयावर योग्य वेळी प्रतिक्रिया देईन, असे सांगत लेब्लँक जास्त बोलणे टाळत आहेत.
महिलांना नोकरी देणे बंद करा, अन्यथा एनजीओंची मान्यता रद्द!
महिला राहत असलेल्या घरांमध्ये खिडक्या बसवण्यावर बंदी
काबुल : अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर तेथील महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले. आता ...
जस्टिन ट्रुडो हे २०१३ पासून लिबरल पक्षाचे नेतृत्व करत आहेत. पण मागील काही वर्षात त्यांनी राबवलेल्या धोरणांमुळे देशात तसेच परदेशात त्यांच्या कारभाराविषयी नाराजी वाढू लागली आहे. पक्षांतर्गत ट्रुडो यांचे विरोधक सक्रीय झाले आहेत. ट्रुडो यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लिबरल पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते करू लागले आहेत.
अलिकडे झालेल्या अनेक सर्व्हेनुसार ऑक्टोबर २०२५ मध्ये होणार असलेल्या निवडणुकीत ट्रुडो हेच चेहरा असतील तर लिबरल पक्षाचा पराभव अटळ आहे. हे सर्व्हे आल्यापासून ट्रुडो यांच्यावरील राजीनामा देण्यासाठीचा दबाव आणखी वाढू लागला आहे.