प्रहार    

बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या ४७ जवानांचा मृत्यू

  118

बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या ४७ जवानांचा मृत्यू बलुचिस्तान : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानच्या सुरक्षा पथकाच्या ४७ जवानांचा मृत्यू झाला आणि ३० जवान जखमी झाले. ही माहिती बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रसारमाध्यमांना दिली आहे.



माजीद ब्रिगेडने बलुचिस्तानमधील तुर्बत शहरापासून आठ किमी अंतरावरील बेहमन भागात केलेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानच्या ४७ जवानांचा मृत्यू झाला, असे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रसारमाध्यमांना सांगितले. हल्ला स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी पावणेसहा वाजता झाला. कराची येथून तुर्बतमधील फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयाच्या दिशेने १३ वाहनांचा ताफा जात होता. या ताफ्याला लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. हल्ल्यात ताफ्यातील एक बस पूर्णपणे नष्ट झाली आणि इतर अनेक वाहनांचे कमी - जास्त प्रमाणात नुकसान झाले.



पाकिस्तान या धक्क्यातून सावरण्याआधीच तालिबानने पाकिस्तान विरोधात कोंकुरसी ही गाइडेड मिसाईल तैनात केल्याचे जाहीर केले. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर, रणगाडे, कमी उंचीवरून उडणारी विमानं, युद्धनौका नष्ट करण्यास सक्षम आहे. तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील लढाई आणखी तीव्र झाली तर कोंकुरसी हे क्षेपणास्त्र तालिबानला पाकिस्तान विरोधात वरचष्मा मिळवून देण्यास सक्षम आहे, असे मत शस्त्रास्त्र अभ्यासक व्यक्त करत आहेत.

अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताना सात बिलियन डॉलरचा आधुनिक शस्त्रांचा साठा सोडून दिला होता. यातील काही शस्त्र लगेच वापरण्यायोग्य स्थितीत होती. तर काही शस्त्र ही डागडुजी करून वापरता येतील अशा स्थितीत होती. तालिबानने या शस्त्रसाठ्याची डागडुजी करून तो वापरण्यायोग्य स्थितीत आणला असल्याचे समजते.
Comments
Add Comment

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर अमेरिकेचे मौन

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ ते १० मे दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या ८८ तासांच्या संघर्षात

दक्षिण कोरियात माजी राष्ट्रपतींच्या पत्नीला अटक

सियोल : दक्षिण कोरियामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्या पत्नी किम केओन यांना शेअर बाजारातील फसवणूक

सोन्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही- ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली. 'ट्रम्प यांनी सोन्यावर कोणताही कर

युक्रेनची पुन्हा फाळणी होऊ देणार नाही: झेलेंस्की ठाम

काही प्रदेशांच्या अदलाबदलीची ट्रम्प यांची वादग्रस्त भूमिका कीव्ह : रशियाशी सुरू असलेल्या युद्धात युक्रेनचा

पश्चिम तुर्कीला ६.१ रिश्टर स्केल भूकंपाचा जोरदार धक्का; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

इस्तंबूल: रविवारच्या रात्री पश्चिम तुर्कीमध्ये ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार

सावधान! तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी ChatGPT वापरता का? तर हे जरूर वाचा...

ChatGPTवर डोळे झाकून ठेवला विश्वास, रुग्णालयात करावे लागले दाखल न्यूयॉर्क: ChatGPTचा वापर करून अनेक कामे केली जाऊ शकतात.