Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीActor Manmohan Mahimkar : ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकरांचा घरच्यांकडून छळ; नातेवाईंकांकडून घर...

Actor Manmohan Mahimkar : ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकरांचा घरच्यांकडून छळ; नातेवाईंकांकडून घर खाली करण्याची धमकी!

मुंबई : बिग बॉस मराठी फेम अंकिता प्रभू वालावलकर हिने काही दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ अभिनेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये एका ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहीमकर यांना इंडस्ट्री मध्ये काम मिळत नसून त्यांना इच्छा मरण हवं असल्याची त्यांनी सरकारकडे मागणी केली होती. त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. डोळ्यात पाणी असलेले अभिनेते मनमोहन माहीमकर हे खूप कळवळतेने गयावया करत होते. हेच मनमोहन माहिमकर चर्चेचा विषय ठरत आहेत.

एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना माहिमकर यांनी असे सांगितले कि, राहत घर विकण्याची जबरदस्ती त्यांचेच नातेवाईक त्यांना करत आहेत. माहिमकर हे गिरगावातल्या सदाशिवलेल येथील जुन्या इमारतींमध्ये राहतात. लवकरच या इमारती रिडेव्हलपमेंटला जाणार आहेत. असं असले तरी दोन वर्षांनी नवीन घराचा ताबा मिळणार आहे पण थोरला भाऊ आणि वहिनी माझ्यावर खोली विकण्यासाठी दबाव टाकत आहेत . वहिनी वारंवार धमक्या देते पोलिसांकडे मदत मागितली पण कौटुंबिक प्रकरण असल्याने ते यात काहीच मदत करत नाही आहेत. पुनर्विकास करणाऱ्या बिल्डरने खोलीचे भाडे दिले नाही त्यामुळे सध्या राहत असलेल्या खोलीचे १३ हजार रुपये भाडे भरायला एफडी मोडावी लागली. बिल्डरने इतरांना भाडे दिले पण आम्हाला दिलेले नाही, असे मनमोहन माहिमकर म्हणाले.

IND vs AUS: टीम इंडियाचे स्वप्न भंगले, सिडनी कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव

मनमोहन माहिमकरांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून केवळ पाच हजार पेन्शन मिळत होती पण ती आता बंद झालीये. त्यामुळे माहीमकर सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. माहिमकरांनी अनेक चित्रपटातुन काम केली आहेत. मात्र त्यांच्या पुढील कारकिर्दीत त्यांना काम मिळेल कि नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -