Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Navi Mumbai Crime : नात्याला काळीमा! जन्मदात्यानेच केला लेकीवर लैंगिक अत्याचार

Navi Mumbai Crime : नात्याला काळीमा! जन्मदात्यानेच केला लेकीवर लैंगिक अत्याचार

नवी मुंबई : नवी मुंबईतून नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक बातमी समोर आले आहे. एका जन्मदात्याने त्याच्या ३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Navi Mumbai Crime)


मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या घणसोली रोड परिसरात घडली आहे. २६ डिसेंबर रोजी पीडित तीन वर्षीय मुलगी घरात एकटी असताना आरोपी पित्याने आपल्या पोटच्या मुलीसोबत अश्लील आणि लैगिंक चाळे केले. नंतर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केला.



दरम्यान, पीडित मुलीची आई घरी परतल्यावर मुलीची अवस्था पाहता विचारपूस केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. तसेच मागील अनेक दिवसांपासून हे काळं कृत्य आरोपी पिता करत असल्याचे समोर आले. यानंतर पीडित मुलीच्या आईने घृणास्पद कृत्याबद्दल नराधमाला जाब विचारला. परंतु यावेळी नराधमाने आईला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली.


या प्रकारानंतर जाचला त्रासलेल्या महिलेने तातडीने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार रबाळे पोलिसांनी अधिक तपास करीत आरोपी बापाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Navi Mumbai Crime)

Comments
Add Comment