Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीChhattisgarh Encounter : छत्तीसगडमधील चकमकीत ४ नक्षलवादी ठार, DRG चा एक जवान...

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमधील चकमकीत ४ नक्षलवादी ठार, DRG चा एक जवान शहीद!

जगदलपुर : छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील अबुझमदच्या जंगलात शनिवारी रात्री उशिरापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. (Chhattisgarh Encounter)

याविषयी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३ जानेवारीला नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्यातील डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त पथके अबुझमद भागासाठी रवाना झाली होती. ४ जानेवारीच्या संध्याकाळी अबुझमदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आणि दोन्ही बाजूंनी मधूनमधून गोळीबार सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत ४ नक्षलांचा खात्मा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यासोबतच या कारवाईत DRG चा एक जवान शहीद झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

Bhoot Bangla : बॉलिवूडचा खिलाडी दिसणार जुन्या अंदाजात! अक्षय कुमारच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की, जंगलात शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत ४ गणवेशधारी नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्याकडून एके ४७ आणि एसएलआर सारखी स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दंतेवाडा डीआरजी जवान हेड कॉन्स्टेबल सन्नू करम हे शहीद झाले. सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे. दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि बस्तर जिल्ह्यातील १ हजार DRG आणि STF जवानांनी शनिवारी नक्षलवाद्यांच्या मुख्य भागाला वेढा घातला होता. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू होता. जवान अजूनही घटनास्थळी हजर आहेत. दरम्यान , या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक (DRG) चे हेड कॉन्स्टेबल सन्नू करम देखील शहीद झाल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या दीड वर्षात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कालावधीत ३०० हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत, सुमारे १००० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून ८३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गेल्या वर्षी १५ डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य २०२६ पर्यंत नक्षलमुक्त होईल, असा दावा केला होता. छत्तीसगड पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या परिश्रम, समर्पण आणि शौर्याचे कौतुक केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -