पुणे : पुण्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुण्यातल्या विद्यमान आमदाराचा नातू बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात मुलाखतीसाठी चाललो असल्याचं सांगून घरातून निघालेला आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू दोन तारखेपासून बेपत्ता आहे. रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
नोकरीसाठी मुलाखत द्यायला चाललो आहे, असे सांगून परळी तालुक्यातील दैठणा घाट या आपल्या मूळ गावावरून निघालेला आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या सख्ख्या भाचीचा मुलगा पिंपरी-चिंचवड शहरातून बेपत्ता झाला आहे. ही घटना दोन जानेवारीला पिंपळे निलख येथील रक्षक चौकात घडली आहे. सुमीत भागवत गुट्टे (वय २४, रा. दैठाना घाट, ता. परळी, जि. बीड) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुमीत यांच्या आईने सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सुमीत याचे नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तो नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. पाच ते सहा दिवसांपूर्वी तो गावावरून पिंपरी-चिंचवड येथे आला. ज्युपिटर हॉस्पिटलला मुलाखतीसाठी चाललो आहे, असे सांगून तो गावावरून शहरात आला. दोन दिवस तो आळंदी येथे राहिला. त्यानंतर गुरुवारी सकाळी तो रक्षक चौक येथे आला. मात्र, तेथून तो बेपत्ता झाला. त्याचा फोनही त्यानंतर बंद येत आहे. शुक्रवारी तो पुणे स्थानकावर दिसला.अद्यापही त्याचा शोध लागला नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…