‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : नववर्ष सुरु झाले असून मनोरंजन क्षेत्रात (Entertainment News) अनेक नवनवीन चित्रपटाची घोषणा होत आहे. अशातच अक्षय कुमार (Akshay Kumar) कडूनही आनंदाची बातमी मिळाली आहे. अक्षय कुमारचे चाहत्यांना बॉलिवूडचा खिलाडी पुन्हा जुन्या अंदाजात दिसणार आहे. अक्षय आणि प्रियदर्शनची अप्रतिम जोडी पुन्हा एकदा धमाल करायला सज्ज झाली आहे. हे दोघेही ”भूत बांगला” (Bhoot Bangla) या हॉरर कॉमेडी चित्रपटातून एकत्र येत आहेत. तसेच या चित्रपटाचे शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर चित्रपटाची रिलीज तारीख देखील समोर आली आहे.
Railway Megablock : मुंबईकरांचे हाल! आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. गेल्या महिन्यात मुंबईत शूटिंग सुरू केल्यानंतर, टीम आता पिंक सिटीमध्ये या हॉरर-कॉमेडीच्या पुढील शेड्यूलचे शूटिंग करत आहे. तसेच भूत बंगला २ एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, हा चित्रपट शोभा कपूर, एकता कपूर आणि अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊस ‘केप ऑफ गुड फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर, फरा शेख आणि वेदांत बाली हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तसेच चित्रपटाची कथा आकाश ए कौशिक यांनी लिहिली आहे, तर पटकथा रोहन शंकर, अभिलाश नायर आणि प्रियदर्शन यांनी तयार केली आहे. या चित्रपटाचे संवाद रोहन शंकर यांनी लिहिले आहेत.