Rohit Sharma: रोहित शर्माने निवृत्तीबाबत मौन सोडले, म्हणाला- मी कुठेही...

सिडनी: रोहित शर्माने(Rohit Sharma) bum सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी निवृत्तिबाबतचे मौन सोडले आहे. खराब फॉर्मशी लढणाऱ्या रोहितला सिडनी कसोटीतून वगळण्यात आले. यानंतर अशी चर्चा सुरू झाली की हिटमॅन आता निवृत्ती जाहीर करेल. तसेच या मालिकेनंतर तो कसोटी फॉरमॅटला बाय बाय म्हणू शकतो. आता रोहितने आपल्या निवृत्तीबाबत आश्चर्यजनक विधान केले आहे.


सिडनी कसोटी सुरू असतानाच रोहितने आपल्याकडून स्पष्ट केले की त्याचा निवृत्तीचा कोणताही विचार नाही. तो सध्या निवृत्त होण्याबाबत विचार करत नाहीये. म्हणजेच हिटमॅनने स्पष्ट केले आहे की तो रिटायरमेंट घेणार नाहीये. तसेच रोहितने आपल्या पुनरागमनाबाबतही आशा व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला मी लवकरच फॉर्मात येईन.


रोहितने सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रानंतर सांगितले, बाहेर लॅपटॉप, पेन आणि पेपर घेऊन बसलेले लोक हे नाही ठरवू शकत की निवृत्ती कधी येईल आणि मला काय निर्णय घेतला पाहिजे. सिडनी कसोटीतून वगळल्यानंतर समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की रोहितला सिलेक्टर्सकडून सांगण्यात आले आहे की बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर तो टीम इंडियाचा भाग असणार नाही. दरम्यान, रोहितने त्याच्या उलट विधान केले आहे. आता भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर काय होते हे पाहावे लागेल.



सिडनी कसोटीत बुमराहचे नेतृत्व


सिडनी कसोटीत रोहित शर्माला वगळल्यानंतर उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना आहे ज्यात बुमराह भारताचे नेतृ

Comments
Add Comment

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या