पुणे : मुंब्य्रात तरुणाने फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितले म्हणून मराठी तरुणाला माफी मागायला लावली. ही घटना ताजी असतानाच, पुण्यात मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील वाकडेवाडी येथील एअरटेल शोरुमचा टीम लीडर शाहबाज अहमद याने मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय केल्याचा आरोप होत आहे. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला ‘मनसे स्टाईल’ बेदम चोप दिल्याची माहिती समोर आली आहे.
एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला हिंदीच बोलायचं, मराठी बोललात, तर कामावरून काढून टाकेन, अशी धमकी टीम लीडर शाहबाज अहमद याने दिली आहे. याशिवाय हिंदू धर्मीय सणांना सुट्टी न देणे, गेले ३ महिने संबंधित मराठी भाषिक कर्मचाऱ्यांचा पगार न करणे असेही आरोप व्यवस्थापनावर आहेत.
या सगळ्या प्रकारानंतर एअरटेलच्या कर्मचाऱ्यांनी मनसे सेनेकडे तक्रार केली. यावर शाहबाज अहमदने मराठी भाषिक मुलांना धमकी दिली की कौनसी भी सेना लेके आओ, नहीं बोलता मराठी… कामावरून काढून टाकतो बघू कोण येतंय, असाही दावा केला जात आहे.
दरम्यान पुण्यातील मनसेचे राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी मुलांचा पगार सोमवार पर्यंत द्या नाहीतर एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील ३ एअरटेल ऑफिस फोडून टाकणार, असा मनसे स्टाईल इशारा दिला असल्याची बातमी समोर आली आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…