Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Mumbai Bandra Fire : मुंबईच्या वांद्र्यात भीषण आग, २५ ते ३० झोपड्या जळून खाक

Mumbai Bandra Fire : मुंबईच्या वांद्र्यात भीषण आग, २५ ते ३० झोपड्या जळून खाक

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीचं सत्र सुरुच आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. याचदरम्यान आता मुंबईतील वांद्रे परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. या परिसरातील झोपड्यांना आग लागली आहे. या परिसरातील झोपड्यांना आग लागली आहे. या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहे. आग लागल्याची घटना घडताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वांद्र पूर्व परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली होती. मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील भारत नगर परिसरात ही मोठी आग लागली आहे. भारतनगर परिसरातील खाडी किनाऱ्यावरील तिवराचे जंगल आणि कचराकुंडीला मोठी आग लागली आहे. परिसरात धुराच या आगीच २५ ते ३० कच्च्या झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. भारतनगर परिसरात लागलेल्या आगीमुळे धुराचे प्रचंड मोठं लोट पसरले आहे. आग लागल्याची माहिती परिसरात बघणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या भीषण आग लागल्याच्या घटनेनंतर ३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

आपत्कालीन सेवांनी तातडीने प्रतिसाद देत अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप समजले नसून परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तपास केला जाईल. आगीमुळे बाधित कुटुंबांना आधार मिळत आहे कारण अधिकारी घटना आटोक्यात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment