
विरुधूनगर : तामिळनाडूच्या विरुधूनगर जिल्ह्यातील सत्तूर भागातील अप्पैया नायक्कनपट्टी येथील साईनाथ फटाका कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. विरुधूनगर येथील फटाके निर्मिती कारखान्यात आतापर्यंत ६ मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती अग्निशमन आणि बचाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये १२ वर्षानंतर महाकुंभमेळा (Maha Kunbhmela 2025) भरविला जातो. महाकुंभाला जाण्यासाठी देशातीलच नव्हे तर ...
यासंदर्भातील माहितीनुसार, स्फोटानंतर कारखान्यातील ४ खोल्या कोसळल्यात. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु फटाके तयार करताना विद्युत गळती किंवा स्फोटकांमधील घर्षणामुळे स्फोट झाला असावा असा संशय आहे. स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाचवण्यात आले आहे आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडूतील फटाका कारखान्यांमध्ये यापूर्वी देखील स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. विरुधूनगर जिल्ह्यातच यापूर्वी झालेल्या २ स्फोटाच्या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. यातील पहिली घटना रंगापलयम परिसरात झाली होती. याठिकाणी फटाक्यांच्या चाचणीदरम्यान झालेल्या अपघातात १२ महिलांसह १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तामिळनाडू सरकारने मृतकांच्या वारसांना ३ लाख रुपये आणि जखमींच्या उपचारासाठी १ लाखांचा मतद निधी दिला होता.