Identify Authentic Hapus : आंबा खवय्यांसाठी महत्त्वाची बातमी, अस्सल हापूस ओळखण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

जामसंडे : आंबा हे फळ कोणाला आवडत नसेल? फळाचा राजा आंबा हे फळंच अत्यंत लोकप्रिय आहे. रत्नागिरीच्या आणि देवगडच्या हापूस आंब्याला मार्केटमध्ये कायमच मोठी मागणी असते. त्यामुळे अनेकवेळा हापूस आंब्याच्या नावाखाली भेसळयुक्त आंब्यांची प्रत्येक मार्केटमध्ये विक्री केली जाते. त्यामुळे बऱ्याचवेळा चांगल्या प्रतिच्या आंब्याची पाहिजे तशी विक्री होत नाही. यासर्व भेसळयुक्त विक्रीमालावर आळा घालण्यासाठी सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. चांगल्या प्रतिच्या आंब्याला योग्य हमीभाव मिळावा तसंच ग्राहकांना देखील चांगल्या प्रतिचे आंबे मिळावे यासाठी शासनाने नवीन उपाययोजना सुरु केली आहे.


मार्केटमध्ये ग्राहकांची हापूस आंब्याबाबत फसवणूक टाळण्यासाठी शासनाने युनिकोडची संकल्पना आणली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळण्याकरीता आता आंब्यावर युनिकोड असणार आहेत. देवगडचा हापूस आंब्याचा दर्जा कायम राहावा यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने युनिकोडबाबतचा निर्णय घेतला आहे. आंबा बागायतदारांनी आंब्याला योग्य तो हमी भाव मिळावा अशी मागणी केली. बागायतदारांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता आंब्यांवर युनिकोड लावण्यात येणार आहे.




अस्सल हापूस आंब्यांवर युनिकोड


यासंदर्भात जामसंडे येथे आंबा बागायतदारांच्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी आंबा उत्पादक संस्थेचे अध्यक्ष सचिन गोगटे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. सचिन गोगटे यांच्या माहितीनुसार, जीआय कायद्याने प्राप्त होणाऱ्या अधिकारांची अंबलबजावणी करत या युनिकोड लावण्यात येणार आहे. २०१८ पासून हापूस आंबा बागायतदारांची मागणी होती, की बाजारात हापूस आंब्याचा दर्जा कायम राहावा. याच अनुशंगाने आता रत्नागिरी आणि देवगडच्या अस्सल हापूस आंब्यांवर युनिकोड असणार असून याचा फायदा ग्राहक आणि बागायतदारांना होणार आहे.



याचपार्श्वभूमीवर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जीआयचे मानांकन मिळालेले आहे. मात्र देवगडच्या आंब्याची मागणी आणि दर्जा बाजारात मोठ्या प्रमाणात असल्याने देवगड हापूस आंब्यांना स्वतंत्र जीआय मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे या वर्षात ज्या आंब्यावर युनिकोडचे स्टीकर छापलेले असतील ते अस्सल हापूस आंबे म्हणता येतील. म्हणूनच दरवर्षी बाजारात हापूस आंब्यांची विक्री करणाऱ्या बागायतदारांना युनिकोड स्टीकरकरिता १० जानेवारी पर्यंत संस्थेकडे नोंदणी करावी लागणार आहे, असं सांगण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य