उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये १२ वर्षानंतर महाकुंभमेळा (Maha Kunbhmela 2025) भरविला जातो. महाकुंभाला जाण्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातील लोकही आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे तिकीट बुकींग करताना भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यंदा १३ जानेवारीपासून कुंभमेळ्याची सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने कुंभमेळा पार्श्वभूमीवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व भाविकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) महाकुंभासाठी ७ राज्यांतून विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. पाहा कसे असेल वेळापत्रक.
कुंभमेळ्यासाठी आयआरसीटीसीने पुणे ते प्रयागराज दरम्यान ‘भारत गौरव ट्रेन’ सुरू केली आहे. ही विशेष ट्रेन १५ जानेवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान धावणार आहे. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘देखो अपना देश’ कार्यक्रमाशीही हा उपक्रम जोडला गेला आहे. भारत गौरव ट्रेनमध्ये प्रवाशांना प्रवासासोबतच जेवण आणि राहण्याची सुविधाही मिळणार आहे.
पुण्याहून प्रयागराजला जाणाऱ्या या भारत गौरव ट्रेनचे इकॉनॉमी क्लास (स्लीपर) तिकीट २२ हजार ९४० रुपये आहे. मानक वर्ग म्हणजेच ३एसी तिकीट ३२ हजार ४४० रुपये आहे. कम्फर्ट क्लास २एसी तिकिटाची किंमत ४० हजार १३० रुपये आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वेने महाकुंभासाठी ७ राज्यांतून विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातून धावणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
त्याचबरोबर रिटर्न ट्रेन क्रमांक ०४६६३, २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी प्रयागराजहून सुटेल व ती ४ वाजून ४५ मिनिटांनी फिरोजपूरला पोहचेल.
तसेच रिटर्न ट्रेन क्रमांक ०४५२७ प्रयागराजहून १८, २१, २६ जानेवारी आणि १०, १६ व २४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघेल.
तर रिटर्न ट्रेन क्रमांक ०४३१५, १९, २२, २५ जानेवारी आणि १०, १७, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि डेहराडूनला परत येईल.
तर रिटर्न ट्रेन क्रमांक ०४६६१, ११ व २१जानेवारी आणि ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अमृतसरला पोहचेल.
रिटर्न ट्रेन क्रमांक ०४०६५, ११, १९, २३ जानेवारी आणि १, १७, १८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अमृतसरला पोहचेल.
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग अशी ओळख मिरवणाऱ्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर १७…
मेघना साने दोन एप्रिलला जागतिक ऑटिझम दिन होता. ऑटिझम म्हणजे नेमके काय याबद्दल मला कुतूहल…
अंजली पोतदार आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. तेव्हापासून तिच्यावर अस्तित्वात असलेल्या…
सुरक्षा घोसाळकर आपल्या संस्कृतीमध्ये अग्नी पूजा हा अतिशय महत्त्वाचा संस्कार मानला जातो. त्यामुळे अग्नीचे पावित्र्य…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये १८ एप्रिल हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी २००८मध्ये जगातील सर्वात…