
‘इलू इलू’ चित्रपटात दिसणार हटके अंदाजात
मुंबई : आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायम चर्चेत राहणारी ‘बिग बॉस मराठी’ (Big Boss Marathi) गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Meera Jagannath) आता हेमा बनून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवायला सज्ज झाली आहे. हेमाचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज आपल्याला आगामी ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. मीराचं दिलखेचक पोस्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ (Ilu Ilu) ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

बांदीपोरा : काही दिवसांपूर्वी पूंछ जिल्ह्यातील एलओसीजवळ सैन्य दलाचं वाहन ३०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात घडला होता. हे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा ...
‘आजवरच्या माझ्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला ‘इलू इलू’च्या निमित्ताने करायला मिळाली याचा आनंद असून हेमा देसाई ही व्यक्तिरेखा मी स्वतः खूप एन्जॉय केली. पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. हेमा देसाई या भूमिकेच्या निमित्ताने मला ती संधी मिळाल्याचं मीरा सांगते.
‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.