बांदीपोरा : काही दिवसांपूर्वी पूंछ जिल्ह्यातील एलओसीजवळ सैन्य दलाचं वाहन ३०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात घडला होता. हे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याची (Jammu Kashmir Truck Accident) घटना घडली आहे. यामध्ये २ जवानांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
CM Devendra Fadnavis : शिवरायांची जिरेटोप घालण्यास देवाभाऊंनी दिला नम्रपणे नकार, म्हणाले…
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा बांदीपोरा येथून सदर कूट पायीन भागातून जाताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Jammu Kashmir Truck Accident)