मुंबई: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात(atul subhash suicide case) बंगळुरूच्या सिटी सिव्हिल कोर्टाने शनिवारी निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानया आणि भाऊ अनुराग सिंघानियासह सर्व आरोपींना जामीन दिला आहे. याआधी न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतले.
सुनावणीदरम्यान निकिता सिंघानियाच्या वकिलांनी पोलिसांकडून केलेल्या उचित आधारांच्या अनुपस्थितीचा हवाला देत असा तर्क दिला की त्यांची अटक ही अवैध होती.
बंगळुरू कोर्टाच्या आदेशानंतर निकिता, निशा आणि अनुराग सिंघानिया यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. यानंतर त्यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून कोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. बंगळुरू पोलिसांनी यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १०८ आणि ३(५) अंतर्गत केस दाखल केली आहे. यात भारतीय दंड विधानाच्या ३(५) अनुसार जेव्हा अनेक व्यक्ती मिळून एकाच इराद्याने गुन्हा करतात तेव्हा त्याची जबाबदारी सर्वांची असते.
तर कलम १०८ हे आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी लावण्यात आले. यात एखादी व्यक्ती जर आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासाठी दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला १० वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
अतुल सुभाषने काय केले होते आरोप?
अतुलने आत्महत्येआधी १ तास २३ मिनिटांचा व्हिडिओ आणि २४ पानांचे सुसाईड नोट जारी करत आपली पत्नी आणि तिच्या कुटुंबियांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यांनी सिंघानिया यांच्यावर प्रकरण संपवण्यासाठी ३ कोटी रूपयांची मागणी केल्याचा आरोप लावला होता.