Friday, May 9, 2025

कोकणमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमीरत्नागिरी

उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी महायुतीच्या वाटेवर ?

उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी महायुतीच्या वाटेवर ?
रत्नागिरी : बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिकच राहणार असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी यांनी २४ तासातच भाषा बदलली. योग्य वेळी योग्य निर्णय असे म्हणत त्यांनी पक्ष बदलाचे संकेत दिले.



उद्धव ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी त्यांच्या भागातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राजापूर आणि लांजा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत अन्याय झाला आहे. योग्य निर्णय घ्यावा, अशी भावना उपस्थितांनी राजन साळवी यांच्यापुढे मांडली. यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असे राजन साळवींनी जाहीर केले.



निवडणुकीतील माझ्या पराभवाला कारणीभूत असलेल्यांचा शोध घेणे आवश्यक आहे; असे राजन साळवी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलले. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असे जाहीर केले.



राजापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झालेल्या राजन साळवी यांचा शिवसेनेच्या किरण सामंत यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला. किरण सामंत हे शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत.
Comments
Add Comment