Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेKalyan East : धक्कादायक! कल्याण पूर्वेत ३ऱ्या मजल्याची ग्रील तुटल्याने ७ वर्षीय...

Kalyan East : धक्कादायक! कल्याण पूर्वेत ३ऱ्या मजल्याची ग्रील तुटल्याने ७ वर्षीय चिमुकल्याचा जीवावर बेतलं संकट

कल्याण : कल्याण पूर्वेतील एका इमारतीच्या दुसऱ्या माळ्याच्या सज्जावर तिसऱ्या माळ्याच्या ग्रील मधून सज्जावर ग्रील तुटल्याने येऊन उभा ठाकलेल्या ७ वर्षीय चिमुकल्याचे दैवत बल्वत्तर म्हणून जीवावर बेतलेले संकट अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचत शिडी लावून वर चढून जात त्या चिमुकल्यास जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली. तर अग्निशमन दलाचे जवान येई पर्यंत तुटलेली ग्रील शेजार्यानी पकडून ठेवल्याने तसेच दुसऱ्या माळ्याच्या सज्जावर तुटलेल्या ग्रीलचा अधार घेत तो चिमुकला उभा होता. निश्चितच दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.

कल्याण पूर्वेतील साईनगर परिसरातील चंद्रकिरण बिल्डिंग तळ मजला ३ मजले असलेल्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेतील ग्रील मध्ये खेळत असलेल्या चिमकुला ग्रील तुटल्याने दुसऱ्या मजल्यावरील सज्जा वर आला. त्याच समयास शेजार्यानी समयसूचकता दाखवित तुटलेल्या ग्रीलला चिमकुलीची सुखरूप सुटका होत नाही तो पर्यंत पकडून ठेवले अशी माहिती सूत्राकडून प्राप्त झाली. चिमुकल्यास अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या सह्याने वर चढत जाऊन सुखरूपपणे खाली उतवरल्याचे पाहून उपस्थितांचा जीव भाड्यांत पडला. अवघ्या ७ वर्षीय चिमकुलीचे दैवबलवत्तर आणि लहानग्या वंश लाडंगे यांचे देखील कौतुक की एवढ्या उंचीवर अग्निशमन दलाचे जवान येई पर्यंत सज्जावर खंबीरपणे उभा राहिला.

Blinkit launches Ambulance : अवघ्या १० मिनिटांत दारात उभी राहणार रुग्णवाहिका, Blinkit ची नवीन सेवा

या चिमकुल्यास रेस्क्यू केले ती टीम चे उपअग्निशमन आधिकारी संजय मस्के , अग्निशमन जवान अलेन डिसूजा, यश जगताप, निखिल सूर्यवंशी, यश जगताप, सुरज माळी, अपूर्व धुमाळ, निलेश शेलार यांचा या रेस्क्यू मध्ये सहभाग होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -