Friday, March 28, 2025
Homeक्रीडाVinod Kambli Home : विनोद कांबळी राहत घर गमावणारं!

Vinod Kambli Home : विनोद कांबळी राहत घर गमावणारं!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी हा चर्चेचा विषय ठरला आहे. मध्यंतरी विनोद कांबळीची प्रकृती खालावली असल्याने त्याला ठाणे येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता विनोद कांबळी यांची प्रकृती ठीक असून त्यांना डिस्चार्ज मिळाल्याची बातमी समोर आली आहे. असं असल तरी घरी येताच विनोद कांबळीला नव्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यावर राहत घर गमवण्याची वेळ आली आहे.

Narayan Rane : सर्वसामान्य जनतेसाठी योजना राबवण्यात अधिकाऱ्यांनी तरबेज व्हावे : खा. नारायण राणे

विनोद कांबळी जास्त काही कमवत नसला तरी BCCI ची 30 हजारची पेन्शन त्याला मिळते. त्यातही मुलांचे शिक्षण स्वतःच आजारपण आणि आता राहत्या घराचा आव्हानात्मक प्रश्न विनोद कांबळी समोर येऊन ठेपला आहे. विनोद कांबळीच वांद्रे येथील घरावर कर्ज नसल तरी त्या घराचा मेन्टेनस त्याने थकवला आहे. हा मेन्टेनस त्याने भरला नाही तर त्याला राहत घर सोडावं लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. विनोद कांबळी आता घर वाचवण्यासाठी नेमक काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -