Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेयेत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांना मिळणार न्याय

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांना मिळणार न्याय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीताराम राणेंना दिले आश्वासन

ठाणे  : गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनात पारित केलेल्या सर्व ठरावांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, त्या-त्या विभागांच्या बैठका घेऊन निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांच्या विविध मागण्यांबाबत विचार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले असल्याची माहिती ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सीताराम राणे यांनी विधान परिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या सह भेट घेतली. यावेळी ठाण्यात प्रथमच अशा प्रकारे गृहनिर्माण संस्थांचे भव्य महाअधिवेशन आयोजित केल्याबद्दल अभिनंदन करून फडणवीस यांनी सीताराम राणे यांच्या १ जानेवारी रोजीच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिष्टचिंतन केले.

MHADA : म्हाडाची १० घुसखोरांना घरे खाली करण्याची नोटीस

सहकार विभाग आणि ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात नुकतेच गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन पार पडले. या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून हजारोच्या जनसमुदायाशी ऑडियो संवाद साधला होता. यावेळी त्यांनी गृहनिर्माण संस्थांचे पुनर्विकास तसेच स्वयंपुनर्विकास यांसह इतर छोट्या मोठ्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले होते. या अनुषंगाने, सीताराम राणे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी महाअधिवेशनात पारित झालेल्या ठरावांच्या गोषवाऱ्यासह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मागण्यांचा विस्तृत अहवाल सीताराम राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधिनियम १५४ ब मध्ये सुधारणा करण्यासह स्वयंपुर्ण पुनर्विकासाबाबत २०१९ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करून लवकरच जिल्हा महासंघांना अधिसूचित करण्यात येईल, असे स्पष्ट केले. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाळीव प्राण्यांविषयीच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी या विषयाशी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून याविषयीची नियमावली करण्याबाबत विचार केला जाईल. त्याचबरोबर, गृहनिर्माण संस्थांच्या इतर विविध प्रश्न व ठरावां संदर्भात सहकार व गृहनिर्माण खात्यासह त्या-त्या विभागाची बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आश्वस्त केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -